Advertisement

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

NATIONAL TALENT SEARCH EXAMINATION NTS (2018-19)
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
 

इ.10 वी साठी राज्यस्तर परीक्षा दि.04 नोव्हेंबर 2018 मधून राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी सुधारित निवडयादी व शाळानिहाय गुणयादी बाबत सूचना...
सदर परीक्षेची सुधारित निवडयादी व गुणयादी मंगळवार दिनांक 19/03/2019 रोजी सायं. 5.00 वाजता परिषदेच्याwww.mscepune.in व www.nts.mscescholarshipexam.in संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहेत.
1)निवड झालेल्या विद्यार्थांना या कार्यालयामार्फत स्वतंत्ररित्या त्यांचे शाळेमार्फत कळविण्यात येईल.
2)राष्ट्रीयस्तर परीक्षा दि. 16 जून 2019 रोजी होणार आहे. संबंधीत निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे मे 2019 च्या पहिल्या /दुसऱ्या आठवड्यात NCERT नवी दिल्ली यांच्या www.ncert.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.
3)सदर परीक्षेसाठी गुंपडताळणी केली जात नाही. सदर परीक्षेसाठी विद्यार्थांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येते तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येते त्यामूळे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या गुणांची गणना करू शकतात.
4)आरक्षित संवर्ग / दिव्यांगत्व आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांचे बाबतीत सदरची निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून संबंधीत विद्यार्थ्यांनी जातीच्या व दिव्यांगत्वाची सक्षम अधिकाऱ्यांच्या दाखल्याची सत्य प्रत NCERT नवी दिल्ली यांना प्रवेशपत्रासोबत परीक्षा केंद्रावर सादर केल्यानंतरच त्यांची निवड अंतिम समजण्यात येईल.
5)उत्तीर्ण होण्यासाठी MAT व SAT या प्रत्येक विषयात 40% गुण व S.C, ST व दिव्यांगत्वासाठी 32% गुण आवश्यक आहेत.
6)MAT व SAT विषयातील खाली नमूद केलेल्या माध्यमातील काही प्रश्न रद्द झालेले असल्याने MAT व SAT विषयाचे गुणदान करताना एकूण 100 प्रश्नांच्या प्रमाणात गुण देण्यात आलेले आहेत.
अ.क्र.माध्यमMAT विषयातील रद्द करण्यात आलेले प्रश्नक्रमांकSAT विषयातील रद्द करण्यात आलेले प्रश्नक्रमांक
1मराठी06,26,38,4562
2उर्दू-
3हिंदी-
4गुजराथी100
5इंग्रजी68,100
6तेलुगू-
7कन्नड30,100
Enter Correct Seat Number

or

Post a Comment

You are requested to leave your comment.

Previous Post Next Post